लालपरीचा प्रवास महागणार

पेट्रोल- डिझेल, सिलिंडर, सीएनजीच्या भाववाढीमुळे आता लालपरीची भाडेवाढ होण्याचे संकेत आहेत.
लालपरीचा प्रवास महागणार
लालपरीचा प्रवास महागणारSaam Tv

मुंबई : पेट्रोल- डिझेल, सिलिंडर, सीएनजीच्या CNG भाववाढीमुळे Rate आता लालपरीची भाडेवाढ होण्याचे संकेत आहेत. लालपरीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आले आहे. या भाववाढीसाठी डिझेल Diesel भाववाढीचा लालपरीवर भार पडत आहे. यामुळे हा भार कमी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. Bus travel will expensive

लालपरीच्या महामंडळाने भाववाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. डिझेलचे भाव वाढल्याने लालपरीवर महिन्याला १२० ते १४० कोटींचा भार पडला आहे. यामध्ये कोरोनाचा Corona काळात पूर्ण क्षमतेने लालपरीची सेवा सुरु नव्हती. लॉकडाऊनचे Lockdown कडक निर्बंध Restrictions असल्यामुळे, अनेक मार्गावर गाड्या बंद करण्यात आले होते.

हे देखील पहा-

यामुळे लालपरीच्या तिजोरीत कमी पैसे येत आहेत. दरम्यान, याआधी जून २०१८ मध्ये, लालपरीने १८ टक्के भाडेवाढ केली होती. आता पुन्हा ही भाडेवाढ होणार असल्यामुळे तिकीट Tickets भावात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लालपरी महामंडळाच्या १५ ते १६ हजार लालपरी डिझेलवर चालतात. Bus travel will expensive

लालपरीचा प्रवास महागणार
नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार?

पूर्ण क्षमतेने लालपरी धावतात, तेव्हा कुठे राज्यभरात दिवसाला लालपरीला १२ लाख ५०० लीटर डिझेल लागत आहे. सध्या लालपरी महामंडळाच्या १० हजार गाड्या धावत आहेत. यासाठी ८ लाख लीटर डिझेल लालपरीला दिवसाकाठी लागत आहे. तसेच लालपरीच्या एकूण महसुलामधील ३८ टक्के म्हणजेच ३ ते ४ हजार कोटी रुपये फक्‍त इंधनावर fuel खर्च होत आहेत, ही माहिती लालपरीच्या महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com