
पुणे: पुणे शहरात (Pune City) हजारो होर्डिंग असताना त्यातील २ हजार २०० पेक्षा जास्त होर्डिंगचे व्यावसायिकांनी २०१४ पासून शुल्क भरले नसल्याने महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने तब्बल १५९ कोटी १० लाख २२ हजार ८७९ रुपयांची वसूल काढली आहे. लेखापरीक्षण विभागाने ही रक्कम वसूल करण्यासाठी स्थायी समितीसमोर लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे. पुणे शहराच्या सर्वच भाग होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे, त्यावर महापालिकेला नियंत्रण ठेवताना नाकी नऊ येत आहे.
होर्डिंगची परवानगी घेतल्यानंतर त्यासाठी महापालिकेचे (Pune Municipal Corporation) प्रति मिटर २२२ रुपये इतके शुल्क भरावे लागते. तसेच दरवर्षी त्याचे नूतनीकरण करतानाही ही शुल्क आकारले जाते. जर वेळेत शुल्क भरले नाही तर महापालिकेकडून पाच पट दंड आकारला जातो. महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने आकाश चिन्ह विभागाकडील २०१४-१५ ते २०२०-२१ या वर्षातील प्रकरणांची तपासणी केली. त्यामध्ये आक्षेपार्ह बाबी आणि वसूलपात्र रक्कम दाखविण्यात आली आहे.
महापालिकेने परवाना शुल्क न भरणाऱ्यांसाठी तडजोड शुल्क पाचपट निश्चीत केले होते, पण त्याविरोधात होर्डिंग व्यावसायिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली, त्यात पाच पट शुल्क घेणे अयोग्य असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यानुसार लेखापरिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत २०१४-१५ पासूनचे परवाना शुल्क रक्कम ६९ कोटी ३२ लाख, तडजोड शुल्क ३ कोटी ६९ लाख आणि २०२०-२१ या वर्षाचे शुल्क ३२ कोटी ६३ लाख रुपये आहे.
तसेच मागील अहवालातील ५३ कोटी ४४ लाख रुपये रक्कम पालिकेला मिळालेली नाही. अशी १५९ कोटी १० लाख रुपये रक्कम येणे बाकी आहे. त्यासंदर्भात आयुक्तांनी निर्णय घ्यावा असा अहवाल मुख्य लेखा परिक्षक अमरिश गालिंदे यांनी स्थायी समितीला सादर झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.