Mumbai News : मुंबई विमानतळावर सुरक्षारक्षकांकडून कॅब ड्रायव्हरला बेदम मारहाण, दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल; मारहाणीचा VIDEO व्हायरल

Mumbai News : वाहन चालकाने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला.
Mumbai News
Mumbai News Saam Tv

संजय गडदे

Mumbai News : मुंबई विमानतळाच्या परिसरात बाहेरील टॅक्सी व रिक्षा चालकांना येण्यास मनाई आहे. मात्र असं असताना देखील एका वाहन चालकाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथे उपस्थित महिला सुरक्षारक्षकाने वाहन चालकाला आत येण्यास मनाई केली. याच रागातून वाहन चालकाने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला.

यानंतर विमानतळावरील इतर पुरुष सुरक्षारक्षकांनी त्या वाहन चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. दयावान देवरे असं मारहाण झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

Mumbai News
Mumbai News : आंब्याचा मोह जीवावर बेतला; 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार 25 मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय टर्मिनस टी 2 येथील पार्किंगच्या ठिकाणी वाहन चालक दयावान देवरे हे जबरदस्तीने प्रवासी घेण्यासाठी आतमध्ये घुसले. मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला सुरक्षा रक्षकाने आत येण्यास मज्जाव केला. (Latest News)

यामुळे वाहनचालक दयावान देवरे याने त्या महिला सुरक्षारक्षकाला लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याच रागातून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर सुरक्षारक्षकांच्या टोळक्याने वाहनचालक देवरे याला लाथाबुक्यांनी मारहाण केली.

Mumbai News
Bike Stunt Video: थरारक! बाईकवरील स्टंटबाजी पडली महागात; काळीज घट्ट करुन पाहा मुंबईतील रस्त्यांवर काय चाललंय

या घटनेनंतर दोन्ही बाजूच्या लोकांविरोधात सहार पोलीस ठाण्यामध्ये भादवि 323, 506(2), 504, 509 आणि कलम 142, 143, 146, 147, 323, 504 असे दोन क्रॉस सीआर घेण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com