
Maval News : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती सरकारने उठवली. त्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) उद्धव ठाकरे गटाकडून (uddhav thackeray faction) पवना धरणाच्या (pawana dam) पायथ्याशी आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)
या आंदोलना (aandolan) दरम्यान 2011 साली बंदिस्त जलवाहिनी विरोधात झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी पवनानगर मधील शेतकरी देखील उपस्थित होते.
पवना जलवाहिनी प्रकल्प राज्य सरकारने रद्द केला नाही तर मावळातून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवरून (highway) एकाही नेत्याची गाडी जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या नेते मंडळींनी लवकरात लवकर पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा अशी मागणी देखील शेतक-यांकडून (farmers) करण्यात आली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.