
Amarinder Singh : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांची राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते. भगत सिंह कोश्यारी यांच्या जागी अमरिंदर सिंह यांना राज्यपाल पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. कोश्यारी कोणत्याही क्षणी पदमुक्त होऊ शकतात अशी माहिती देखील मिळत आहे.
कोण आहेत अमरिंदर सिंग
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जवळपास नऊ वर्षे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. गेल्या वर्षी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. मात्र युतीला निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. स्वतः कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही त्यांची जागा वाचवता आली नाही. त्यानंतर अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील झाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असताना, राज्यपाल कोश्यारींनी ही विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.