Accident Video : भरधाव कार दुभाजकाला धडकून हवेत उडाली; समोरुन येणाऱ्या कारवर आपटली, पाहा व्हिडीओ

Loni Kalbhor : हवेली येथील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी ही घटना घडली.
Pune Accident
Pune Accident Saam TV

>> सचिन जाधव

Pune Solapur Highway Accident Video : पुणे -सोलापूर महामार्गावर एका भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हायवेवरील डिव्हाडर ओलांडून बोलेरो कार दुसऱ्या लेनमध्ये अक्षरश: उडून आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हवेली येथील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी ही घटना घडली.

सोलापूरच्या दिशेने निघालेली बोलेरो गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. बोलेरो कार रस्त्याच्या डिव्हाडरवरून पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळली. रविवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Pune Accident
Thackeray Vs Shinde : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? आज फैसला; निर्णयाबाबत दोन शक्यता

या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. जखमींना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com