Navneet Rana: नवनीत राणांचा 'लीलावती'मध्ये फोटो काढणे भोवणार!

लीलावती रूग्णालयातील सुरक्षा अधिकाऱ्याने बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
Navneet Rana: नवनीत राणांचा 'लीलावती'मध्ये फोटो काढणे भोवणार!
Lilavati HospitalSaam Tv

मुंबई : लीलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) खासदार नवनीत राणा यांचे स्कॅन करताना त्यांचे फोटो काढणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लीलावती रूग्णालयातील सुरक्षा अधिकाऱ्याने बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोवरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत होत्या.

Lilavati Hospital
Rana On Uddhav Thackerray : मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येण्यासाठी महाआरती करणार - नवनीत राणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण (Hanuman Chalisa Controversy) करू, असे आवाहन देणाऱ्या खासदार नवनीत (Navneet Rana) राणा यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी लीलावती (Lilavati Hospital) रुग्णालयात उपचारही घेतले. यावेळी रुग्णालयात नवनीत राणा यांचे एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडीओ शुटींग आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या मातोश्री या निवास्थानी हनुमान चालीसा पठण करू, असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांनी दिले होते. त्यांच्या या आव्हानानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. मात्र शिवसैनिकांना चकमा देत राणा दाम्पत्यांनी गनिमी काव्याने मुंबईत प्रवेश केला. मुंबईत आल्यानंतर ते आपल्या खारमधील निवास्थानी थांबले. त्यानंतर मुंबईत दोन दिवस राजकीय वातावरण तापले होते. याप्रकरणी शिवसेनेकडून तक्रार दाखल झाल्यावर राणा दाम्पत्यावर कारवाई झाली. त्यानंतर दोघेही 12 दिवस तुरुंगात होते.

दरम्यान, 12 दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर नवनीत राणा या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. मानेचा त्रास असल्याने त्यांच्यावर तिथे एमआरआय करण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या फोटो शूटला शिवसेनेने आक्षेप घेतला. MRI चे यंत्र अत्यंत संवेदनशील असल्यानं त्या खोलीमध्ये कुणालाही कॅमेरे किंवा मोबाईलचा वापर करता येत नाही. असं असतानाही राणांच्या उपचारांची शुटिंग कशी काय झाली, असा सवाल शिवसेनेनं लिलावती रुग्णालय प्रशासनाला केला आहे. सदर फोटो आणि व्हिडीओ करण्याबाबत रुग्णालय प्रशासनावर कुणाचा दबाव होता का, असाही सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी विचारला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com