Lonavala : IPS कार्तिकांनी टाकला लोणावळ्यातील हाॅटेलवर छापा; आंबट शाैकिनांची पळता भुई थोडी, 53 जणांवर गुन्हा

हाॅटेलमधील ध्वनी यंत्रणा जप्त केली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.
Lonavala
Lonavalasaam tv

Lonavala : ध्वनी यंत्रणेचा (sound system) आवाज माेठ्या स्वरुपात करुन अश्लील गाण्यावर अश्लील प्रकारचे नृत्य (dance) सुरु असताना टाकलेल्या धाडीनंतर पाेलिसांनी (police) 53 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लाेणावळा (lonavala) येथील एका हाॅटेलमध्ये (hotel) घडली आहे.

Lonavala
Ration : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; येत्या ७ ते ९ फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप बंद राहणार, कारण...

लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (satyasai kartik) यांना वलवण गावातील एका हाॅटेलमध्ये काही जण अश्लील गाण्यावर अश्लील नृत्य करीत आहेत. तसेच ध्वनी यंत्रणा माेठ्या आवाजा लावली आहे. विवस्त्र चाळे करून गाण्याचे तालावर पुरुष आणि महिला नाचत आहेत अशी माहिती मिळाली.

Lonavala
Milk Price : शेतक-यांनाे ! दूध खरेदी दरात हाेऊ लागली वाढ; जाणून घ्या कारण

त्यामुळे कार्तिक यांनी स्वतः पथकासह व लोणावळा शहर पोलीसांचे कर्मचारी यांच्यासमवेत रात्री बाराच्या सुमारास संबंधित हॉटेल येथे धाड टाकली. घटनास्थळी पाेलिसांना अंचबित करणा-या गाेष्टी पाहयला मिळाल्या. पाेलिसांनी एकुण 44 पुरुष व 9 महिला असे हॉटेलच्या प्रांगणात नृत्य करणा-यांना समज दिली.

दरम्यान या घटनेतील (incident) संबंधित लाेकांकडून नियमांचे व तरतुदीचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 53 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हाॅटेलमधील ध्वनी यंत्रणा जप्त केली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com