Ghatkopar : महिला लैंगिक छळ आणि हत्या प्रकरण; आरोपीस अटक!

साकीनाका येथे एक महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच घाटकोपर मध्ये फुटपाथ वर राहणाऱ्या एका महिलेची देखील लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत हत्या झाल्याचे समोर आले आहे.
Ghatkopar : महिला लैंगिक छळ आणि हत्या प्रकरण; आरोपीस अटक!
Ghatkopar : महिला लैंगिक छळ आणि हत्या प्रकरण; आरोपीस अटक!SaamTvnews

मुंबई : साकीनाका येथे एक महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना घाटकोपर मध्ये फुटपाथ वर राहणाऱ्या एका महिलेची देखील लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत हत्या झाल्याचे समोर आले आहे. हा आरोपी या अगोदर देखील एक महिलेच्या हत्येचा प्रकरणात अटक होता.

हे देखील पहा :

सागर निहाल यादव असे या आरोपी चे नाव आहे. घाटकोपर पूर्व येथील एक फुटपाथ वर राहणाऱ्या शोभा जाधव या महिलेची दोन तारखेला हत्या झाली होती. मात्र, या प्रकरणात पोलिसांना आरोपी मिळून येत नव्हता. अखेर गुन्हे शाखा आणि पंत नगर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या सहाय्याने मानखुर्द येथून या आरोपीचा शोध घेतला आहे. शोभा आणि सागर हे काही वर्षांपूर्वी एकमेकांना ओळखत होते.

Ghatkopar : महिला लैंगिक छळ आणि हत्या प्रकरण; आरोपीस अटक!
Viral Video : डोंबिवलीत भर रस्त्यात एकाला दांडक्याने जबर मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!

तुरुंगातून बाहेर आल्यावर सागर जेव्हा घाटकोपरला आला तेव्हा त्यांने जुन्या रागातून आणि लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शोभाला पकडले आणि तिने विरोध केल्यावर बंडेड पट्टी ने तिचा गळा आवळून हत्या केली. या आरोपीने या अगोदर देखील महिलेची हत्या केली आणि ही दुसरी हत्या असून हा व्यक्ती सिरीयल सायको किलर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com