TET Exam Scam: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी कोट्यावधींचं घबाड

TET परीक्षा घोटाळा प्रकरण.
TET Exam Scam: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी कोट्यावधींचं घबाड
TET Exam Scam: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी कोट्यावधींचं घबाडSaam TV

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरात 2 कोटी रुपयांची कॅश आणि सोनं सापडलं आहे. यापूर्वी सुपेंच्या घरात 88 लाख रूपये सापडले होते. TET परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांच्या घरी आणखी घबाड सापडलं आहे. पोलिसांच्या तपासात आणखी मोठी नावं आणि मोठं घबाड मिळण्याची शक्यता आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटीहुन अधिक रक्कम आणि सोने मिळाले.

TET Exam Scam: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी कोट्यावधींचं घबाड
रोहित पाटलांच्या वक्तव्याची चर्चा; 'तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार'

दरम्यान टीईटी परीक्षा पेपर (TET Exam) फुटी घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख, आणि अभिषेक सावरीकर यांची नावे सामोर आल्या नंतर पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर साम टीव्हीच्या हाती दोन ऑडिओ क्लिप आल्या होत्या, या ऑडिओ क्लिप नुसार या संपूर्ण घोटाळ्याची पाळं मुळं आत्ता जालना जिल्ह्यापर्यंत पोचली होती.

साम टीव्हीच्या हाती लागलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एजंट आणि योगेश जाधव यांच्या संभाषना दरम्यान जालना जिल्ह्यतील एका प्राध्यापकांचा आणि शिक्षकाचा या टीईटी परीक्षा पेपर फुटी घोटाळ्या प्रकरणी सबंध असल्याचं समोर आलं आहे. नेमके हे घोटाळेबाज शिक्षक आणि प्राध्यापक कोण आहे, यांचा शोध घेण्यासाठी साम टीव्हीची टीम त्यांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली होती. या आरोपांनंतर प्रा सुनील यांचे वडील अर्जुन कायदे यांनी आरोप फेटाळून लावले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com