
Kranti Redkar On Sameer Wankhede: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (kranti redkar instagram) हिने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओत ती म्हणाली आहे की, ''हे कलयुग आहे इथे चांगलं काम करणाऱ्यांना टिकू दिलं जातं नाही, त्यांना त्रास दिला जातो.''
काय म्हणाली क्रांती रेडेकर?
हा व्हिडीओ शेअर करत क्रांती रेडकर (kranti redkar husband) म्हणाली आहे की, 'हे कलयुग आहे इथे चांगलं काम करणाऱ्यांना टिकू दिलं जातं नाही, त्यांना त्रास दिला जातो. मात्र मोजक्या काही चांगल्या लोकांना सतत त्रास देऊन पापापा घडा भरला जाईल आणि तेव्हा भगवान महादेव प्रलय आणतील. पृथ्वी फक्त चांगल्या गोष्टीमुळे चालते आहे. मोजके चांगले लोक तिला चालवत आहेत. आपल्याला त्यांचा साथ द्यायचा आहे. मी चांगुलपणा सोबत आहे. तुम्ही आहात का?', असं ती म्हणाली आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे (sameer wankhede wife) यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. अटकेपासून संरक्षण देताना न्यायालयाने त्यांच्यासमोर काही अटीही ठेवल्या आहेत. त्या म्हणजे त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल करता येणार नाही.
समीर वानखेडे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबत केलेल्या कथित चॅट समोर आली. आर्यन खान प्रकरणात न्यायालयाने सीबीआयला 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.