
सचिन गाड
Mumbai News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आले आहेत. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांना समन्स बजावलं आहे.
समीर वानखेडे यांना गुरुवारी सीबीआयच्या टीम समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे. (Breaking Marathi News)
माहितीनुसार समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.