CCTV Footage: रेल्वे पुलावर प्रवाशांना मारहाण करत लुटमार, कल्याण रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना

Kalyan News: कल्याण जीआरपीच्या पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं.
Kalyan News
Kalyan News Saam TV

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन जनांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

दीपक मगर, कुणाल गोंधाळे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. साहिल काकड पसार झाला असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. हे सर्व आरोपी उल्हासनगर येथे राहतात. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (CCTV Footage)

Kalyan News
CCTV Footage : थरार! ओव्हरटेक करुन धडक देत गाडी थांबवली, मग गोळीबार अन् कोयत्याने वार VIDEO

मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाच्या नव्या पादचारी पुलावर सुखवीर सिंग नावाचा प्रवासी झोपला होता. सुखवीर हे कल्याण रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यांना सकाळी पुण्याला जायचे होते. गाडीची वाट पाहत पुलावर बसले असताना त्यांचा डोळा लागला. सुखवीर झोपले असल्याचे पाहून चार तरुण त्यांच्याजवळ आले. या चौघांनी सुखवीर यांना लाथेने मारून उठवले, त्यानंतर त्यांना धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतले.

Kalyan News
Building Collapse: आदल्या रात्री घरात वाढदिवसाचं सेलिब्रेशन; मात्र शेजाऱ्यांची एक चूक अन् तीन मजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

यानंतर इतर दोन प्रवाशांना देखील त्यांनी मारहाण करत त्यांच्या जवळील मोबाईल आणि काही रोकड हिसकावल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सुखबीर यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार नोंदवली. इतर दोन प्रवासी अद्यापपर्यंत तक्रार करण्यास आलेले नाहीत. कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात या आरोपींचा शोध सुरू केला. कल्याण जीआरपीच्या पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com