
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण १०६ जणांना हे पुरस्कार देण्यात येणार असून त्यांची नावे सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका नावाचा समावेश आहे. (Latest Marathi News)
यंदाच्या वर्षी ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण तर ९१ पद्मश्री जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातून परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकर परशुराम खुणे यांनी पाच हजारांहून अधिक नाटकांमध्ये जवळपास ८०० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
परशुराम खुणे हे महाराष्ट्रातील गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातून येतात. त्यांचे नक्षलग्रस्त भागातील दिशाभूल झालेल्या तरुणांचे पुनर्वसन करण्यातही मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. भारत सरकारने 1954 मध्ये या नागरी पुरस्कारांची घोषणा केली होती आणि काही वर्षे वगळता हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिले जातात.
यंदा जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारामध्ये पश्चिम बंगालचे माजी डॉ. दिलीप महालानबीस यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात येणार आहे. ओआरएसच्या शोधाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. यंदा एका व्यक्तीला मरणोत्तर पद्मविभूषण आणि 25 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.