Mega Block
Mega BlockSaam tv

Mega block Update: अंबरनाथ- कर्जत दरम्यान उद्या मेगाब्लॉक, वाचा सविस्तर माहिती

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ ते कर्जत रेल्वे स्थानका दरम्यान उद्या रेल्वेचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

अंबरनाथ : मध्य रेल्वेच्या (central railway) अंबरनाथ ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान उद्या रेल्वेचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात (Mega block) पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं सकाळी १०.५० ते दुपारी १.१० या वेळेत अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Mega Block
Latur : कोरोनाचा धोका कायम; बूस्टर डोसकडे ज्येष्ठ नागरिकांनी फिरवली पाठ

बदलापूर रेल्वे स्थानकातील कर्जत दिशेचा पादचारी पूल धोकादायक झाल्यामुळं काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यामुळं प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना संपूर्ण रेल्वे स्थानकाला वळसा घालून स्कायवॉकने पूर्व-पश्चिमेचा प्रवास करावा लागत होता. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या पादचारी पुलाच्या बाजूला आता नवीन पादचारी पूल उभारण्याचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलंय. या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचं काम उद्या रविवारी करण्यात येणार आहे. यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकातून होणारी दोन्ही दिशेची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे.

Mega Block
मोठी बातमी! माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्षांची शिक्षा

अंबरनाथ ते कर्जत या सेक्शनमध्ये सकाळी १०.५० ते दुपारी १.१० या वेळेत संपूर्ण रेल्वेसेवा बंद ठेवली जाणार आहे. या काळात मुंबईकडे येणाऱ्या हैद्राबाद सीएसएमटी एक्स्प्रेस आणि कोइंबतूर एलटीटी एक्स्प्रेस या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जत पनवेल दिवा या मार्गानं वळवून पुढे मुंबईकडे नेल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलाय. दिव्याचा प्लॅटफॉर्म लहान असल्यानं या गाड्या २ वेळा थांबवल्या जातील,अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.

Edited By - Naresh shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com