RPF Constable Saves life of Passenger: रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला आला हार्टअटॅक; आरपीएफ जवान ठरला देवदूत

RPF saved passenger's life at Kurla station : एका प्रवाशाला हार्टअटॅक आल्यानंतर आरपीएफने सीपीआर देऊन जीव वाचवला आहे.
Railway News
Railway NewsSaam Tv

RPF saved passenger's life at Kurla station

सध्या लोकांमध्ये हार्टअटॅकचे प्रमाण वाढू लागले आहेत. अनेक तरुणांचे हार्टअटॅकमुळे जीव गेले आहेत. लोकांना चालता-फिरता, प्रवासात हार्टअटॅक येण्यााचे प्रकार वाढले आहेत. असाच प्रकार मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनवर घडला आहे. एका प्रवाशाला हार्टअटॅक आल्यानंतर आरपीएफने सीपीआर देऊन जीव वाचवला आहे. या प्रवाशासाठी आरपीएफ जवान देवदूत ठरला आहे. (Latest Marathi News)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरपीएफ जवान मुकेश यादव यांनी एका व्यक्तीचा जीव वाचवण्याचं मोठं काम केलं आहे. या आरपीएफ जवानाचं सर्वत्र कौतुक होत आहे .

Railway News
Shivsena News : शिवसेना ठाकरे-शिंदे गट आमने-सामने; सेनाभवनासमोरच शिंदे गटाची नवी शाखा

नेमकं काय घडलं?

गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याचा सुमारास कुर्ला स्थानकावर क्रमांक सात ते आठ प्लॅटफॉर्मवर एका प्रवाशाला हार्टअटॅक आल्याने जमिनीवर कोसळला. त्यानंतर या प्रवाशाला वाचवण्यासाठी आरपीएफ जवान धावला.

आरपीएफ जवानाने तातडीने या प्रवाशाला सीपीआर दिला. तातडीने सीपीआर दिल्याने प्रवाशाचा जीव वाचवला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

'आरपीएफ जवानाने प्रवाशाला सीपीआर दिल्यानंतर स्टेशन मास्तर , आरपीएफ आणि जीआरपीच्या मदतीने प्रवाशाला भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले, असे मध्य रेल्वेचे शिवराज मानसपुरे यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी, भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी आरपीएफ जवानाचं प्रवाशाला वेळेवर सीपीआर दिल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. सीपीआर दिल्यामुळे प्रवाशाचा श्वास परत आला आणि त्याचा जीव वाचला. सध्या या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे.

Railway News
Heart Attack Death : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com