Indian Railway: तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना चाप

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे कन्फर्म तिकीट मिळवून देण्यासाठी दलाल प्रवाशांची लूट करतात. या काळाबाजार करणाऱ्या दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे
Indian Railways News
Indian Railways NewsSaam Tv

मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे कन्फर्म तिकीट मिळवून देण्यासाठी दलाल प्रवाशांची लूट करतात. या काळाबाजार करणाऱ्या दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी (Police) कंबर कसली असून एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने ६८४ गुन्ह्यांमध्ये ८२४ दलालांना ताब्यात घेतले आहे. (Central Railway tightening noose against railway ticket pimps)

त्यांच्याकडून थोडीथोडकी नाही, तर २ कोटी १८ लाख रुपयांची १९ हजार २६८ तिकिटे जप्त करण्यात आली; तर मध्य रेल्वेने (Central Railway) २६७ गुन्हांत ३२८ दलालांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी २० हजार रुपयांची तिकिटे जप्त केली.

Indian Railways News
औरंगाबादेत हेल्मेटसक्तीची पुन्हा एकदा कडक अंमलबजावणी

कोरोनामुळे (Corona) फक्त आरक्षित तिकीटधारकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे तिकिटांचा मोठा काळाबाजार होत होता. अनधिकृत दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. ही बाब निदर्शनास आल्याने दलालांविरोधात विशेष अभियान हाती घेतले होते. त्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात पश्चिम रेल्वेने विशेष अभियान हाती घेतले होते. या अभियानांत आरपीएफ गुन्हे शाखा, सायबर सेल आणि विभागीय रेल्वे अधिकारी यांची टीम गठित केली होती. तिकीट तपासणी अभियानात निदर्शनात आले की, अनेक प्रवासी बोगस ओळखपत्राचा वापर करून, रेल्वे तिकिटांचे आरक्षण केले जात आहे. पश्चिम रेल्वेने २०२१ मध्ये विशेष अभियानांतर्गत अशा ६८४ गुन्हांत ८२४ दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून २ कोटी १८ लाख रुपयांचे १९ हजार २६८ रेल्वे तिकीट जप्त केले आहेत.

मध्य रेल्वेकडून ३२८ जणांना अटक
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या‍ दलालांविरोधात २६७ गुन्हे नोंदवण्यात आले असून आतापर्यंत ३२८ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेतील या दलालांकडून एक कोटी २० हजार रुपयांची ७ हजार ७७४ तिकिटे जप्त केली आहेत. ज्यामध्ये ई-तिकीट आणि काउंटर तिकिटांचा समावेश आहे. २६७ गुन्ह्यांपैकी एकट्या मुंबई विभागात १२१ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत १५९ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून ७४ लाख रुपयांची ई-तिकीट आणि काउंटर तिकिटांसह ४ हजार ४७८ तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com