Railway News : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा व उंबरमाळीदरम्यान रेल्वे रूळाखाली खड्डा

कसारा व उंबरमाळी दरम्यान रेल्वे रूळाला तडे गेले.
Railway (File Photo)
Railway (File Photo)Saam Tv

फयाज शेख

Railway News : मध्य रेल्वेवरील कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळाखाली खड्डा पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे.

मध्ये रेल्वेच्या कसारा व उंबरमाळी दरम्यान रुळाखाली खड्डा पडला होता. त्यामुळे कसाराहून मुंबई सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. (Latest News)

Railway (File Photo)
Satish Kaushik Passed Away: काही तास आधी मित्रांसोबत होळी सेलिब्रेशन; पाहा सतिश कौशिक यांचे निधनापूर्वीचे फोटो

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. रूळाखाली असलेला मातीचा भराव अचानक धसल्याने रूळा खाली मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा तात्पुरता भरण्यात आला आहे.

यामुळे कल्याण, मुंबई सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला होता. कसारा-CSMT साठीची 6.57ची लोकल रद्द करण्यात आली होती. तर लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com