Pune Rain News: पुण्यात 3 दिवस अवकाळी पाऊस बरसणार! अवकाळीने आंब्याच उत्पादन घटलं

Pune News Alert : पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील तीन दिवस पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज
Pune Rain News
Pune Rain NewsSaam TV

Pune News: पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. पुण्यातील तापमान 37 अंश सेल्सियस इतका राहणार आहे. तर सायंकाळी शहरासह उपनगरात ढगाळ वातावरण राहणार आहे.

बुधवारपर्यंत पुण्यात स्थिती कायम राहण्याचा अदांज वर्तवण्यात आला आहे. रविवारी सुद्धा पुण्यात पाऊस झाला होता. पर्वा एकदिवस खुला गेला आणि त्याच्या आदल्यादिवशी सुद्धा पावसाने पुण्यात हजेरी लावली होती. आता पुढील तीन दिवस पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Pune Rain News
Pune News : जात्याला व्यायामाच्या उपकरणाचा दर्जा, दत्तात्रय गाडगीळ यांना मिळालं पेटंट

अवकाळी पावसाने आंब्याच उत्पादन घटलं

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच उत्पादन घटलं आहे. सध्या बाजारात फक्त 30 टक्केच आंबा आहे. यातच आवक कमी असल्याने आंब्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, पुणे, नाशिक, बीड, धुळे अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. नाशिकमध्ये जोरदार गारपीट झाली तर भीमाशंकरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह तुफान गारपिट झाली होती.

Pune Rain News
Karnataka Election 2023 : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा भाजपला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

भिमाशंकर परिसरातील अनेक गावांत सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊस आणि तुफान गारपिट झाली होती. आंबेगाव तालुक्यातील जांभोरी आसाणे, कुशिरे, अडिवरे येथील डोंगरकड्यावरच्या भागात अचानक वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने उन्हाळी बाजरीसह आंबा आणि जनावरांची खाद्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com