प्रेम केलं एकीशी, संसार थाटला दुसरीशी, लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार : तरुणीच्या भावनांचा खेळ करुन 25 लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक, त्यानंतर...
Pune crime update
Pune crime updatesaam tv

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. प्रेमीयुगुल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. परंतु, प्रेम आंधळं असल्यामुळं प्रेमात (love affaire matter) पडताना पुढं धोका आहे, याचं भानही काहींना राहत नाही. पुण्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. एक तरुणीने प्रेमावर विश्वास ठेवून एका तरुणाला आयुष्यभर साथ देण्याचा वचनही दिले. पंरतु त्या तरुणाने तरुणीच्या भावनांचा खेळ करुन तिच्याच नावावर २५ लाख रुपयांचे कर्ज काढले आणि दुसऱ्या तरुणीशी विवाह केला. आपली फसवणूक झाल्याचे (Fraud case) लक्षात येताच पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. शांतनु बाळासाहेब महाजन (२८) असं अटक (culprit arrested) केलेल्या आरोपीचं नाव आहे.

Pune crime update
मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा, मुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे निर्देश

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शांतनु बाळासाहेब महाजन (रा.न्याती इलेशिया, थिटेनगर, खराडी) या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे एमसीए झाले आहे. तर आरोपी तरुणाने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. दोघांनीही लग्नासाठी एका लग्न नोंदणी संबंधी संकेतस्थळावर त्यांच्या नावाची नोंदणी केली होती.

Pune crime update
Akola : अकोल्यात शिवसेनेला धक्का! सेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया समर्थकांसह शिंदे गटात सामील

त्यानंतर शांतनुने फिर्यादी तरुणीचा संपर्क क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री केली. तरुणीने त्याच्यावर विश्‍वास ठेवल्यानंतर त्यांनी शारिरीक संबंधही ठेवले. तरुणाने पीडित तरुणीच्या मोबाईलवर तिच्याच नावाने विविध प्रकारचे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड केले. त्याद्वारे त्याने बॅंकेतून वेळोवेळी 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले.ते पैसे खर्चही केले.त्यानंतर त्याने पीडित तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. तरुणाने दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न करुन नवा संसारही थाटला. हा प्रकार समजल्यानंतर तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठून तरुणाविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला अटक केली.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com