Mumbai: चांदिवाल आयोगाची आजची शेवटची सुनावनी; वाझेंनी केली अनिल देशमुखांची चौकशी

Mumbai: न्यायमूर्तींनी परवानगी दिल्यानंतर वाझे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करत आहेत.
Sachin  Vaze And Anil Deshmukh
Sachin Vaze And Anil Deshmukh Saam Tv

मुंबई: चांदिवाल आयोगाची आजची शेवटची सुनावनी असणार आहे. या सुनावनीच्या वेळी सचिन वाजेने स्वत: न्यायमूर्ती कैलास चांदिवाल यांच्याकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यानुसार न्यायमूर्तींनी परवानगी दिल्यानंतर वाझे (Sachin Waze) आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चौकशी करत आहेत. (Chandiwal Commission's last hearing today; Waze interrogated Anil Deshmukh)

हे देखील पहा -

अ‍ॅंटिलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटी वसुली प्रकरण या प्रकरणांमधील मुख्य आरोपी पोलिस दलातील माजी अधिकारी सचिन वाझे यांनी आज थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी केली आहे. आज चांदीवाल आयोगाची (Chandiwal Commission) शेवटी सुनावणी आहे. यात आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या सुनावणीचा अहवाल महिन्याभरात सादर केला जाणार आहे. आजच्या सुनावणीत मुख्य आरोपी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांची उलट तपासणी अनिल देशमुखांनी केली आहे.

चांदिवाल आयोग सुनावनी दरम्यान वाझेंनी देशमुखांना विचारेले विचारलेले प्रश्न:

सचिन वाजे: माजी सीपी परमबीर सिंग यांच्यावर गेल्या वर्षी ३० मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या जीआरची माहिती तुम्हाला होती का?

अनिल देशमुख: परमबीर यांनी त्यांच्या पत्रात केलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत.. मी मुख्यमंत्र्यांना चौकशी सुरू करण्याची विनंती केली.

सचिन वाजे: माझा प्रश्न असा आहे की, ३० मार्चच्या सरकारी ठरावात तुमचा सहभाग होता?

देशमुख: मी नाही म्हटलं आहे.. मी मुख्यमंत्र्यांना समिती नेमण्याची विनंती केली.

वाजे: तुम्हाला जीआर बद्दल कधी कळले?

देशमुख: जीआर पब्लिक डोमेन आहे, म्हणून मला कळले

वाजे: स्पेशल आयजी किंवा आयजी (पोलीस) मध्ये काही वेगळे आहे का?

देशमुख: मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे नाही

Sachin  Vaze And Anil Deshmukh
'चित्रपटात ते कलाकार होते नथुराम नव्हे;' शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

दरम्यान या सुनावणीचा अहवाल महिन्याभरात सादर केला जाणार आहे. सचिन वाझे यांनी सह आयुक्त मिलिंद भारंबे यांना साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलवावे असा अर्ज केला आहे. पुढील सुनावनी २४ जानवारी म्हणजेच सोमवारी ठेवण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com