Supriya Sule : 'कायदा आता गृहमंत्री फडणवीसांच्या म्हणण्यानुसार चालतो'; शाईफेक प्रकरणावरून सुप्रिया सुळे असे का म्हणाल्या?

मनोज गरबडे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यावर सामाजिक वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule And Devendra Fadnavis
Supriya Sule And Devendra Fadnavis Saam tv

Supriya Sule News : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेकीनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेकी फेकणाऱ्या मनोज गरबडे याच्यावर कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न करणे असे आरोप एफआयआर रिपोर्टमध्ये लावण्यात आले आहे. मनोज गरबडे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यावर सामाजिक वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News )

Supriya Sule And Devendra Fadnavis
'अहिंसेच्या मार्गाला जास्त महत्व देतो,पण...'; चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणावर भाष्य केलं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, 'मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलेली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये झालेली घटना अयोग्य होती. आपण त्याचा निषेध करू शकतो. मात्र, शाईफेक करणं या गोष्टीच समर्थन होऊ शकत नाही. शाई फेकणं आपली संस्कृती नाही'.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे याच्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ' मला वाटत कायदा आता नियमानुसार चालत नाही. तर गृहमंत्र्यांच्या मर्जीनुसार चालतो. जो विरोधात बोलतो, त्यांच्या विरोधात ईडी लावली जाते. ईडीच्या केस या केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवरच आहे. विरोधी पक्षातील नेता भाजपमध्ये गेल्यावर त्याला वाशिंग मशीन सारखा साफ होऊन क्लीन चिट दिली जाते'.

Supriya Sule And Devendra Fadnavis
Chandrakant Patil: मी तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार; चंद्रकांत पाटलांचं पवार घराण्याला डायरेक्ट चॅलेंज

कलम ३०७ म्हणजे काय?

कलम ३०७ मध्ये हत्येच्या प्रयत्नात दोषी आढळलेल्या आरोपीला या कलमातंर्गत शिक्षा दिली जाते. या प्रकरणांमध्ये दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकते. या प्रकरणात पीडित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असेल, तर त्याच्यावर हल्ला करणाऱ्याला जन्मठेपेपर्यंतची कारावासाची शिक्षा दिली जाते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com