Sharad Pawar: पवारांची मेट्रो ट्रायल म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या; चंद्रकांत पाटलांची टीका

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोने प्रवास केला आहे. पवारांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिकेपर्यंतचा प्रवास केला असून पवारांच्या याच प्रवासावरती भाजप नेते चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी टीका केली आहे.
Sharad Pawar: पवारांची मेट्रो ट्रायल म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या; चंद्रकांत पाटलांची टीका
Sharad Pawar: पवारांची मेट्रो ट्रायल म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या; चंद्रकांत पाटलांची टीकाSaam TV

पुणे: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोने प्रवास केला आहे. पवारांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिकेपर्यंतचा प्रवास केला असून पवारांच्या याच प्रवासावरती भाजप नेते चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले, मेट्रोची चाचणी करायची होती तर त्यासाठी केवळ शरद पवार यांना का निमंत्रित केले असा आपला मेट्रो प्रशासनाला सवाल आहे. पुण्यात आठ विधानसभा सदस्य आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये तीन विधानसभा सदस्य आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आहेत. माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर हे पुण्याचे निवासी आहेत. मेट्रो प्रशासनाला उद्घाटनपर धाव घ्यायची होती तर त्यांनी या सर्व लोकप्रतिनिधींना तसेच पुण्याच्या महापौरांना (Mayor) सन्मानाने सहभागी करायला होते. त्यांनी केवळ एका नेत्याला श्रेय देण्याचा का प्रयत्न केला, असा आपला सवाल आहे.'

Sharad Pawar: पवारांची मेट्रो ट्रायल म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या; चंद्रकांत पाटलांची टीका
Satara: उदयनराजेंचे मनोरंजन पहा व साेडून द्या; सातारकरांना शिवेंद्रराजेंचे आवाहन

तसंच मेट्रो (Metro) एवढ्या घाईघाईने ट्रायल घेण्याचे कारण काय? आहे यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? 11 हजार कोटींच्या या प्रकल्पामधील 8 हजार कोटी केंद्राने दिले असून कोरनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यममुळे आता मेट्रोवरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली असून या ट्रायलला फक्त शरद पवार का असही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com