'काही लोकांकडून जाणून बुजून आरक्षण...'; छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप

महापुरुषांचे विचार आपल्याला पसरविले पाहिजे यासाठी महापुरुषांचे विचार घेऊन प्रत्येक घरात जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
Chhagan bhujbal News
Chhagan bhujbal News saam tv

रश्मी पुराणिक

मुंबई : 'समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. काही लोक जाणून बुजून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही महापुरुषांच्या विचारांवर चालणारी आहे. महापुरुषांचे विचार आपल्याला पसरविले पाहिजे यासाठी महापुरुषांचे विचार घेऊन प्रत्येक घरात जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (Chhagan Bhujbal News )

Chhagan bhujbal News
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर CM एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत माजी उमुख्यमंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीत भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणावर (OBC Reservation) भाष्य केलं. 'केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी आमची सुरवाती पासूनची मागणी आहे मात्र केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी, अशी आग्रही मागणी छगन भुजबळ यांनी आज केली.

छगन भुजबळ पुढे म्हणाले, 'ओबीसींचा इम्पिरिकल डाटा मिळावा यासाठी राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केली. महेश झगडे यांच्यासारखे हुशार लोक त्यात घेतले मात्र महेश झगडे एकटेच लढत होते. आयोगाने अनेकवेळा घेतलेल्या भूमिकांना देखील आमचा विरोध होता. आयोगाच्या रिपोर्ट मध्ये अनेक त्रुटी देखील आहेत. मात्र त्या दुरुस्तीसाठी आता आपण प्रयत्न करणार आहोत'.

'समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. काही लोक जाणून बुजून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही महापुरुषांच्या विचारांवर चालणारी आहे. महापुरुषांचे विचार आपल्याला पसरविले पाहिजे यासाठी महापुरुषांचे विचार घेऊन प्रत्येक घरात जा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली आणि शिवजयंती सार्वजनिकरित्या महात्मा फुले यांनी सुरू केली दुसरी कोणीही नाही. मात्र काही लोक जाणूनबुजून चुकीचा इतिहास सांगतात, असेही ते म्हणाले.

Chhagan bhujbal News
राज्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी CM एकनाथ शिंदे यांनी दिले 'हे' महत्वाचे निर्देश

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, 'समता परिषदेने मोठा संघर्ष हा नेहमीच केला आहे.आता देखील लोकांमध्ये फिरून ओबीसींची संख्या ही ५४% टक्के आहे हे आपण सांगितले पाहिजे आणि आयोगाने दिलेल्या डाटा मध्ये जिथे जिथे चुका असतील त्या दुरुस्त व्हावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे'. फुले - शाहू - आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या लोकांमागे आपण उभे राहिले पाहिजे यासाठी महिलांनी देखील पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी मांडले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com