27 वर्ष आरक्षण संपवण्याचे काम भाजपनं केलं- छगन भुजबळ

राजकारणपलीकडे जाऊन महाराजांना पाहिले पाहिजे असेही भुजबळ म्हणाले.
27 वर्ष आरक्षण संपवण्याचे काम भाजपनं केलं- छगन भुजबळ
27 वर्ष आरक्षण संपवण्याचे काम भाजपनं केलं- छगन भुजबळSaam TV

रश्मी पुराणिक

मुंबई : कर्नाटकात (Karnatak) झालेल्या घटनेचे महाराष्ट्रात पडसात पडले आहेत. अनेक नेत्यांनी त्यावर आपला निषेध नोंदवला आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराज हे महाराष्ट्राला नाही तर देशाला अभिमान वाटतो अशी विभूती आहेच. मोदींनी पण छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून देशात पोस्टर लावले, मग महाराजांनी काय वाईट केलं?. ज्या नराधमांनी हे केलं त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं मत भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे. राजकारणपलीकडे जाऊन महाराजांना पाहिले पाहिजे असेही भुजबळ म्हणाले.

27 वर्ष आरक्षण संपवण्याचे काम भाजपनं केलं- छगन भुजबळ
TET Exam Scam: प्रा. कायंदेंच्या घरी पुणे गुन्हे शाखेचे पथक दाखल; पाहा Video

27 वर्ष आरक्षण संपवण्याचे काम भाजपने केलं

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशा विरुद्ध भाजप पदाधिकारी कोर्टात गेले. इम्पिरीकल डेटा देणार नाही असं केंद्राने सांगीतलं, नंतर सांगितलं हा ओबीसी डेटा नाही. आधी वाटलं होतं महाराष्ट्र अडचणीत येईल, पण आता देश अडचणीत येत आहे. मध्य प्रदेश नंतर कर्नाटक, यूपी लाईनमध्ये आहे. सगळ्यांना अडचण येणार आहे. तांत्रिक गोष्टीसाठी आरक्षण नाकारलं जात आहे, आणि या तांत्रिक बाबींचा कोण फॉलो अप घेत आहे. आता मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागा, राजीनामा सोडा ओबीसी समाजाचा अधिकार डावलला गेला आहे. संपूर्ण देशात हक्कावर गदा आणली आहे अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. 27 वर्ष आरक्षण संपवण्याचे काम भाजपने केलं. ओबीसी डेटा असताना ते देत नाही, संपूर्ण जबाबदारी भाजपची असल्याची टीका भुजबळ यांनी केली आहे.

सहकारवरुन भाजपवर टीका

सहकार निर्माण केला ते काँग्रेस मंडळी होती. नंतर सगळ्यांनी मिळून सहकार खेड्या पाड्यात नेला. गावात पैसे दिले, दोन चार गोष्टी चुकीच्या झाल्या तर कारवाई करावी, पण त्यामुळे सहकार चुकीचं काँग्रेसने वाट लावली हे म्हणणं चुकीचं आहे. सहकार राजकारणासाठी तुमचे दरेकर पासून अनेक मंत्री सहकारमध्ये आहेत. सहकार वाईट होता मग का आले तुमच्याकडे. अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com