
- Ramesh Vatre
Prakash Ambedkar News : राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सर्वच नेते मंडळी आणि विशेष करून माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे फुले कुटुंबियांचे आम्ही फार मोठे भक्त आहोत असे भासवितात. पण माझी त्यांना विनंती आहे की, सावित्रीबाई फुले (savitribai phule) व अहिल्यादेवी होळकर (ahilyadevi holkar) यांचा पुतळा हटविल्या प्रकरणी भुजबळ यांनी राजीनामा द्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॅा. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. चौफुला (ता.दौंड ) येथे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या शिक्षक मेळाव्याच्या उदघाटनानंतर आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. (Maharashtra News)
आंबेडकर म्हणाले, १९९२ साली नागपूर येथे गोवारी हत्यांकाड घडले होते. या हत्यांकाडांत ११४ गोवारींची हत्या झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ तेव्हा आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाचे आमदार मखराम पवार यांनी 'ज्या सभागृहात संवेदनशीलता नाही त्या सभागृहाचा मी राजीनामा देत आहे' असे सांगत आमदारकीचा राजीनामा दिला होता. मखराम पवार यांचा कित्ता भुजबळ यांनी गिरवावा. निषेध म्हणून भुजबळ यांनी राजीनामा द्यावा असेही आंबेडकर यांनी नमूद केले.
आंबेडकर म्हणाले मखराम पवार यांच्या राजीनाम्याच्या परिणाम असा झाला की, गोवारींच्या सर्व मागण्या सरकारने लगेच मान्य केल्या. महापुरूषांचा अपमान रोखायचा असेल तर कुणीतरी पुढाकार घ्यावा लागेल. छगन भुजबळ यांनी निषेध म्हणून राजीनामा द्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.
एका उत्तरात आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला अजून खूप अवधी आहे. आमची अद्याप तयारी नाही आहे. निवडणुका लागल्यानंतर त्या आम्ही लढविणार आहोत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.