मोदी तुकारामाच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले; शिंदेंच्या बंडावर भुजबळांची मिश्किल टिप्पणी

मंत्री छगन भुजबळ आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेले होते.
मोदी तुकारामाच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले; शिंदेंच्या बंडावर भुजबळांची मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal On Eknath ShindeSaam TV

मुंबई : 'पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथ शिंदेना घेऊन गेले.' असा मिश्किल टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या राजकीय बंडावर बोलताना लगावला. काल शिंदे यांनी राज्य सरकारविरोधात केलेल्या बंडखोरी मुळे राज्यातील सरकार अस्थिर झालं आहे.

या पार्श्वभूमीवर आज सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठका आयोजित केल्या आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडीवर छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले. अशी मिश्कील टीप्पणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काही महत्वाची भूमिका घेतील असं वाटत नसल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला.

हे देखील पाहा -

तसंच संजय राऊतांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने. असं ट्वीट केलं आहे. याबाबत भुजबळांना प्रश्न विचारला असता आपण अद्याप हे ट्वीट पाहिलं नसल्याचं सांगितलं.

ते म्हणाले, 'मी अजून संजय राऊत यांचे ट्वीट पाहिलं नाही. शिवाय आपण आता शरद पवार यांना भेटण्यासाठी जात आहोत. काही मार्ग निघतो का यावर चर्चा करु. शरद पवार याकडे लक्ष देतील,” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री महत्वाची भूमिका घेतील का? असं विचारलं असता, मला तरी वाटत नाही. ही नेहमीप्रमाणे होणारी बैठक असल्याचं भुजबळ म्हणाले.

तसंच शिवसेनेच्या अंतर्गत मुद्द्यावर मी काय बोलणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय सरकारमध्ये राहणं, सरकार पडणं, राजीनामा देणं या सगळ्या गोष्टी आम्हाला काही नवीन नाहीत, मध्यावधी लागू होऊ दे अथवा काहीही राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com