
Mumbai News: राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळीने राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान होतंय. तसेच कांद्याला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मात्र शासनाकडून हवी तशी मदत मिळत नाही. अशात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. जर आज महाराज असते तर शेतकऱ्यांची परिस्थिती फार निराळी असती नाही का? त्यांनी कायम बळीराजाच्या हिताचा विचार केला. (Latest Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Video)
आपल्या तरुण पिढीने महाराजांचे विचार आचरणात आणणे फार गरजेचे आहे. अनेक ठिकाणी तरुणाई वाईट मार्गाला जाताना दिसते. काही तरुण शिक्षणाच्या अभावी वाईट मार्ग पत्करतात. तसेच काही तरुण मंडळी तासंतास फोनवर गेम खेळणे आणि चॅटिंग यामध्ये वेळ घालवतात. मात्र अशा तरुणांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कार्य वाचले पाहिजे.
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सुंदर काळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गाणी आणि पोवाडे यातून देखील काही मंडळी महाराजांची कीर्ती जगभर पसरवत आहेत. अशात एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. यात काही तरुण मंडळी महाराजांच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
मुंबईतील कायमच गजबजलेला परिसर म्हणजे मरीन लाइन्स या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. " राजं आलं राजं आलं जिंकुनिया जगभरी... " या गाण्यावर तरुणांनी ताल धरला आहे. आकाश साळवी या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे.
मरीन लाइन्सवर नागरिक नेहमीच फिरण्यासाठी येत असतात. समुद्राच्या लाटा पाहत आपल्या मनातील कलह शांत करतात. तर काही तरुण मंडळी इंग्रजी किंवा हिंदी गाण्यांवर नाचताना दिसतात. अशात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर या तरुणांनी ताल धरला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लाईक मिळालेत. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.