'पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यात मुख्यमंत्री व्यस्त; संभाजीराजे छत्रपतींना भेटणं टाळलं'

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली.'
Sambhaji Raje Chhatrapati And Eknath Shinde
Sambhaji Raje Chhatrapati And Eknath ShindeSaam TV

रुपाली बडवे -

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे. मात्र, मराठा समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना (Sambhaji Raje Chhatrapati) भेटण्यास वेळ नाही. मुख्यमंत्र्यांनी आज संभाजीराजेंची भेट टाळली असल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे प्रवक्ता धनंजय जाधव यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना धनंजय जाधव यांनी सांगितलं की, 'मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालय येथे आले होते. प्रथम त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन आढावा घेतला व त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ -

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले पण समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले' असल्याचंही जाधव यांनी सांगितलं.

Sambhaji Raje Chhatrapati And Eknath Shinde
Vedanta Foxconn : 'वेदांता'वरून शरद पवारांनी 'त्या' एकाच वाक्यात PM मोदी, CM शिंदेंवर साधला निशाणा

तसंच ते पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा आहेत. ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही खूप जल्लोष केला होता. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांना संभाजीराजे भेटायला आल्याचं वारंवार कळवलं तरी देखील ते आले नसल्याचंही जाधव म्हणाले. त्यामुळे आता संभाजीराजे मुख्यमंत्र्यावर नाराज होऊन गेल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com