Raju Srivastava: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली

राजू श्रीवास्तव यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे.
Raju Srivastav Passed Away
Raju Srivastav Passed AwaySaam Tv

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हास्यकलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastava Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील (Delhi) एम्स रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. 42 दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekntah Shinde) यांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Raju Srivastav Passed Away
Chaturshrungi Police Station : पुण्यात पोलीसावर हल्ला; युवकावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,'अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून दाखवल्या. विनोद निर्मितीतून ते भाषा आणि प्रांत यांच्या सीमा ओलांडून घराघरांत पोहचले. त्यांनी कलाक्षेत्रातही रचनात्मक असे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे,' असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com