Dasara Melava: शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार? CM एकनाथ शिंदे काय म्हणाले वाचा!

दसरा मेळावा शिवसेनेसाठी इतका महत्त्वाचा का?
Eknath Shinde
Eknath Shinde Saam TV

मुंबई: शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली. शिंदे गटाने शिवसेना पक्षासह चिन्हावर देखील आपलाच अधिकार असल्याचा दावा केला आहे. शिवाय आता शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन (Shivsena Bhavan) देखील उभारणारणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मांडली आहे. यामुळे शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणारअसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

हे देखील पाहा -

दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार. दसरा मेळावा परंपरागत होत असल्याने हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचे ठरले आहे. लवकरच त्याबाबत कुठे होणार आहे ते कळवले जाईल असे देखील एकनाथ शिंदेंनी या बैठकीत म्हटले आहे.

दसरा मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, यासह कायदा आणि सुव्यवस्थेचं भान ठेऊन वागा अशी तंबी देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे जे काय होईल ते नियमानुसार होईल असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

Eknath Shinde
शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं, तर आज मुख्यमंत्री झाला असता : उद्धव ठाकरे

दसरा मेळावा शिवसेनेसाठी इतका महत्त्वाचा का?

महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि वाटचाल ठरवण्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निश्चितपणे उल्लेख करता येईल. दरवर्षी दसरा मेळाव्यात स्व बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावती भाषण असायचे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्येक सभा ही विरोधकांची पिसं काढणारी आणि आक्रमक असायची. मात्र, बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे स्थान हे काही वेगळेच असायचे.

त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान गर्दीने तुडूंब भरलेले असायचे. यावेळी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द ना शब्द कानात साठवून ठेवायचे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दिलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी कायमच प्रमाण होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com