...म्हणून मी साखर कारखाना काढला नाही; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
Uddhav Thackeray Saam Tv

...म्हणून मी साखर कारखाना काढला नाही; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

आज पुण्यात राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन झाले.

पुणे : पुण्यात २ दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी हडपसरला आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, 'मला पण एक साखर कारखाना काढावा अस वाटतो, पण मला गडकरी याच एक वाक्य आठवत की, कारखाना काढून माणसाला आयुष्यातून उठवल जातं, त्यामुळे मी कारखाना काढणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.

आज पुण्यात राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी नेते शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब पाटील,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होते.या परिषदेत साखर उद्योगासमोरील समस्या, त्यावर उपाययोजना, भविष्यातील संशोधन या विषयांवर चर्चा होणार आहे.

Uddhav Thackeray
घोडेबाजार शब्दावर अपक्ष आमदार संतापला; प्रतिमा खराब होत असल्याने तक्रार करणार

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)ऑनलाईन उपस्थित राहिले होते यावेळी बोलताना ते म्हणाले, मी नितीन गडकरी आणि शरद पवारसाहेब यांनी एवढं बोलल्यावर यावर मी आभार प्रदर्शन केलं असत तरी चालेलं असतं. आम्ही शहरीबाबू,आम्हाला चहात साखर किती असं विचारायची सवाय पण आता गडकरी साहेब यांच्यामुळे आता गाडीत साखर किती अस विचारावं लागेलं.

मला साखरतील काही कळत नाही. साखरेचा प्रश्न येतो तेव्हा मी माझ्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सहकाऱ्यांकडे पाहतो. एवढ्या सगळ्या अडचणी असतात साखर उद्योगात. मला पण एक साखर कारखाना काढावा अस वाटतो,पण मला गडकरी याच एक वाक्य आठवत की, कारखाना काढून माणसाला आयुष्यातून उठवल जातं,त्यामुळे मी कारखाना काढणार नाही असं वक्तव्य देखील मुख्यमंत्र्यांनी केलं.

Uddhav Thackeray
महाराष्ट्रातही रक्तचंदन तस्कर 'पुष्पा'; नगरमध्ये गोदामातून ७६६० किलोंचा साठा जप्त

तसंच आपला देश कृषिप्रधान देश आहे. आपण नाही अन्न धान्य पिकवणार नाही तर कोण पिकवणार? आपला शेतकरी मर मर मेहनत करतो,कधी ही थकत नाही. पण सोन्यासारख्या त्याच्या मालाला मोल मिळालं नाही तर तो थकतो. शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे केंद्रीय पातळीवर एक ऊस प्रश्नावर केंद्रीय धोरण आणलं तर चांगलं काम होईल. मला ऊस उद्योगातलं कमी कळत हे प्रामाणिकपणे सांगितलं आहे. शरद पवार यांचे अभिनंदन की त्यांनी सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून साखरेचा गोडवा इथं आणला आहे,सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून जे हवं ते ते द्यायला तयार आहोत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com