'जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाच्या चरणी प्रार्थना!

मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली.
'जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाच्या चरणी प्रार्थना!
'जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाच्या चरणी प्रार्थना!SaamTV

रश्मी पुराणीक

मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली असून कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.(Chief Minister Uddhav Thackeray's prayer to Ganarayya)

हे देखील पहा-

आजपासून श्री गणरायाचं आगमन होत आहे राज्यासह देशातील अनेक नेतेमंडळी अभिनेत्यांनी गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे तसेच आता राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या शासकीय विश्रामगृहामध्ये गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे यावेळी त्यांनी गणरायाजवळ, 'जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी केली असल्याच ते म्हणावे शिवाय आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले

'जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाच्या चरणी प्रार्थना!
लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापणा पूजेस विलंब...

गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल अशी मला खात्री आहे असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला, लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते, आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनीदेखील कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरू करूयात ही शपथ आजच्या या मंगल दिनी घेऊयात अस आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com