Chinchwad Election Result: चिंचवडचा गड 'भाजप'कडे, अश्विनी जगताप यांचा मोठा विजय; राष्ट्रवादीला धक्का

भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ७० मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे.
Chinchwad By Election
Chinchwad By ElectionSaamtv

Chinchwad By Election Result: चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) मोठा धक्का बसला असून भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ९१ मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. चिंचवडमध्ये भाजपाकडून अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. (Chinchwad By Election)

Chinchwad By Election
Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंचा डंका; RPI आठवले गटाचे २ उमेदवार विजयी

आज सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला.

या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नाना काटे यांच्यासाठी राष्ट्रवादीची (NCP) फौज चिंचवडमध्ये तळ ठोकून होती. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी पुण्यात ठाण मांडलं होतं. मात्र तरीही लक्ष्मण जगताप यांचं मागील अनेक वर्षांचं काम पाहून लोकांनी अश्विनी जगताप यांना निवडून दिलं आहे.

कोणाला किती मते...

चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली.

विजयानंतर पहिली प्रतिक्रिया.....

"दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कामांची पावती मतदारांनी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षासह महायुतीतील सर्व पक्षांनी कार्यकर्त्यांनी काम केले. विजयाचे श्रेय पक्षातील कार्यकर्त्यांना आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आहे. मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली कामे मी पूर्ण करणार आहे," अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com