'राणेसाहेब' काय तयारीचे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे; प्रवीण दरेकरांचा विनायक राऊतांना टोला!
'राणेसाहेब' काय तयारीचे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे; प्रवीण दरेकरांचा विनायक राऊतांना टोला!-SaamTV

'राणेसाहेब' काय तयारीचे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे; प्रवीण दरेकरांचा विनायक राऊतांना टोला!

चिपी विमानतळाच्या उद्धाटना बाबत खासदार विनायक राऊतांनी एवढी घाई करण्याची काहीच आवश्यक नव्हती.

सिंधुदुर्ग : 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील (Sindhudurg) चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र "चिपी विमानतळाच्या उद्धाटना बाबत खासदार विनायक राऊतांनी एवढी घाई करण्याची काहीच आवश्यक नव्हती, त्यांनी 7 तारीख जाहीर करण्याची घाई का केली? कोणत्याही प्रकारचे कन्फर्मशन नसताना अंदाजे त्यांना वाटलं की उद्घाटन होईल, नारायण राणे (Narayan Rane) बोलण्याआधी आपण बोलून मोकळं व्हावं, पण राणे साहेब काय तयारीचे आहे तुम्हा सर्वांना माहिती आहेच" असं पत्रकारांनाशी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Paravin Darekar) यांनी राऊतांना टोला लगालवला आहे. (Chipi Airport Inauguration Ceremony)

हे देखील पहा-

गेली अनेक दिवस चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उद्धाटनावरुन श्रेयवादाची राजकीय लढाई सुरु आहे अशातच शिवसेनेच्या विनायक राऊतांनी (Vinayak Raut) हे उद्धाटन 7 ऑक्टोंबरला होईल असे जाहीर केले मात्र हे उद्धाटन 9 ऑक्टोंबरला होणार असल्याचे नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यांशी भेटून तारीख ठरवली असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.

'राणेसाहेब' काय तयारीचे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे; प्रवीण दरेकरांचा विनायक राऊतांना टोला!
Anil Deshmukh Case: ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत

यावरुनच चिपी विमानतळाच्या उद्धाटनावरुन पुन्हा राणे विरुध्द सेना असा सामना रगंला असतानाच राऊतांना उद्धाटनाच्या तारखेवरुन गडबड करायची गरज नव्हती कोणंतीही पुर्ण माहिती न घेता केवळ राणे साहेबांच्या आधी बोलायच म्हणून राऊतांनी काहीही घोषणा केली होती मात्र नारायण राणे काय तयारीचे आहेत हे आपणा सगळ्यांना माहित आहेच त्यांनी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन परफेक्ट कार्यक्रम ठरवला आणि तो ठरल्या दिवशी होणार असल्याची माहिती प्रविण दरेकरांनी दिली.

कोकणला काहीतरी देऊन जा

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणात Kokan विमानतळाच्या उद्धाटनाला येत असतील तरी त्याचे आम्ही स्वागत करू पण आल्यासारखे कोकणला कायतरी देऊन जावा तुम्ही केवळ वादाच्या टीका टिपणी करण्यासाठी येणार असला तर कोकणच्या जनतेला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही आणि त्या येण्याचा काही उपयोग नाही असा टोलाही दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com