Sakinaka rape case: महिलांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका: चित्रा वाघ

महिलांसाठी तुम्ही काय करताय, शक्ती कायद्याचं काय झालं ते पहा
Sakinaka rape case:  महिलांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका: चित्रा वाघ
Sakinaka rape case: महिलांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका: चित्रा वाघ

दिल्लीतील निर्भयाच्या बाबतीत जे झालं तेच मुंबईतील साकीनाक्यात झालं. आम्ही तिला वाचवू शकलो नाही, भाषण, घोषणांपलीकडे सरकारने काही केलं नाही. तुमच्या नाकाखाली काय होतंय ते पहा, महिलांसाठी तुम्ही काय करताय, शक्ती कायद्याचं काय झालं ते पहा, कायदे कुठे गेले, पोलीस कुठे गेले, अशा शब्दात भाजपा महिला उपाध्यक्षा चिंत्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape case) पिडीतेचे उपचारादरम्यान, मृत्यू झाला. त्यानंतर संपुर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे.

हे देखील पहा-

महिला आयोगाला अध्यक्षा का नाहीत, असा सवाल विचारत चित्रा वाघ यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाना साधला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंडवडे निघाले आहेत. राज्यात पहिल्यांदा महिलांनी राज्यातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप केलेत. राज्यसरकराने बलात्काऱ्यांना आश्रय देण्याचा प्रयत्न केला. सरकार म्हणत आम्ही राजकारण करतो, शक्ती कायद्याचं काय झालं, असा सवालही त्यांनी राज्यसरकारला केला आहे.

तर दुसरीकडे, '' खैरानी रोड अत्याचार पीडित महिलेच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. महिलांचा आदर आणि सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने फास्ट ट्रॅक खटला चालवून दोषी नराधमांना लवकरात लवकर फासावर चढवावे आणि त्या दुर्दैवी महिलेस न्याय द्यावा. '' अशी मागणी खासदार पुनम महाजन यांनी केली आहे.

Sakinaka rape case:  महिलांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका: चित्रा वाघ
निवृत्त ACP असल्याचे सांगत महिला शिक्षिकेवर केला बलात्कार

साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape case) पिडीतेचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील साकीनाक्यातील खैरानी रोड (khairani road) परवा एका 30 वर्षीय महिलेवर बलात्काराची झाल्याचे वृत्त समोर आले होते. 9 सप्टेंबरला साकीनाकाच्या खैरानी रोड भागात पिडीता बेशुद्धावस्थेत आढळून आली. पोलिसांनी उपचारासाठी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं. पीडितेची प्रकृती परिस्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com