Chitra Wagh News: आणखी श्रद्धा होऊ नयेत ही पालक म्हणून आपली ही जबाबदारी - चित्रा वाघ

पालक म्हणून जो संवाद गरजेचा आहे तो कायम ठेवल्यास या गोष्टी टाळणे शक्य आहे, असे मत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे.
Chitra Wagh News
Chitra Wagh NewsSaam TV
Chitra Wagh News
Shraddha Walkar Case: श्रद्धाची शेवटची चॅटिंग आली समोर, मित्राला 'ती' बातमी सांगायची राहूनच गेली

३६३ च्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ

श्रध्दाच्या प्रकरणातून एक मोठा धडा मिळालेला आहे. एक गंभीर बाब समोर आली आहे ती म्हणजे मुलींचे गायब होण्याचे अपहरणाचे प्रमाण, ३६३ चे गुन्हे जास्त प्रमाणात वाढले आहेत. यात अनेक मुली १८ वर्षांखालील आहेत. त्यामुळे पोलिसांनी (Police) त्यांच्याकडे अधिक लक्ष दिल्याने बऱ्याच मुलींना घरी परत आणण्यात यश आले आहे. मात्र या मुलींचे गायब होण्याचे कारण फक्त अपहरण नसून काही मुलींना प्रेमाची फुस लावल्याने त्या स्वत:हून गेलेल्या आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Chitra Wagh News
Shraddha Walkar Case: श्रद्धाच्या पत्राची महाराष्ट्र पोलिसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांची चौकशीची मागणी

Chitra Wagh Latest News:दिल्ली येथे झालेल्या श्रध्दा वालकर हत्याकांडाची झळ संपूर्ण देशाला बसली आहे. प्रत्येक व्यक्ती या घटनेमुळे हळहळ आणि संताप व्यक्त करत आहे. या घटनेने पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. श्रद्धा तर गेलीच, पण आणखी श्रद्धा होऊ नयेत ही पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. पालक म्हणून जो संवाद गरजेचा आहे तो कायम ठेवल्यास या गोष्टी टाळणे शक्य आहे, असे मत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. (Chitra Wagh On Shraddha Walkar Case)

पालकांचं विशेष लक्षं असणं गरजेचं

पालकांच्या (Parents) जबाबदारी विषयी त्यांनी सांगितले की, अशा प्रकरणात अनेक मुली घरी परत आल्यावर त्यांचे पालक बदनामी आणि पोलिस चौकशी यांच्या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत. त्यामुळे अशी अनेक प्रकरणं दाबून टाकली जातात. मात्र प्रत्येक पालकाने मुलगी किंवा मुलगा यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, असं आवाहन चित्रा वाघ यांनी पालकांना केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com