चित्रा वाघांच्या ट्वीटमधील 'रावण' कोण आणि 'शूर्पणखा' कोण...

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून चित्रा वाघ यांचं खळबळजनक टट्विट
चित्रा वाघांच्या ट्वीटमधील 'रावण' कोण आणि 'शूर्पणखा' कोण...
चित्रा वाघांच्या ट्वीटमधील 'रावण' कोण आणि 'शूर्पणखा' कोण... Saam Tv

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर अशी ट्वीटर वाॅर सुरु होण्याची शक्यता आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून चित्रा वाघ यांचं खळबळजनक टट्विट केलं आहे. महिलांची शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल, तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा दर वेळेला सरकारच नाक कापलं जाईल, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

हे देखील पहा-

त्यांच्या ट्वीटमुळे अनेक चर्चा रंगायला लागल्या आहेत. राज्य महिला आयोग अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होणार हे निश्चित आहे. याची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये शुर्पणखा आणि रावण हा उल्लेख त्यांनी नक्की कुणाला उद्देशून केला आहे, या बद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com