मनसेला आज पुण्यात दुसरा धक्का; दौंडच्या शहराध्यांचा तडकाफडकी राजीनामा

राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबात भुमिका घेतल्यानंतर शाहबाज पंजाबी यांनी मनसेचा राजीनामा दिला होता.
मनसेला आज पुण्यात दुसरा धक्का; दौंडच्या शहराध्यांचा तडकाफडकी राजीनामा
ManaseSaam TV

पुणे: दौंड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेवरून जमीर सय्यद हे नाराज आहेत. मनसे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटस्करांना पत्र लिहून त्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान मनसेचे शहर उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी यांनीही आपल्या पदाचा पुन्हा राजीनामा दिला आहे. ते पुण्यातील कोंढवा भागातील मशिदींसमोर मनसे कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा लाऊ देणार नाहीत असा निर्णय त्यांनी घेतला आहे.

राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबात भुमिका घेतल्यानंतर शाहबाज पंजाबी यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. परंतु पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला होता. ते शिवसेनेमध्ये प्रवेण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयाने राज्यातील मुस्लीम समाज नाराज झाला. मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी याअगोदरही मनसेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरेंनी आपल्या उत्तरसभेतही आपल्या भोंग्यांवरच्या भूमिकेवर ठाम राहिले. मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे ही राज ठाकरेंच्या या भूमिकेवर नाराज होते, त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यानंतर त्यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागले होते. आता काल सभेमध्ये राज ठाकरेंनी ४ तारखेपासून शांत बसणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज ठाकरेंची भूमिका काय असते आणि त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.