मनसेच्या 'त्या' दाव्यानंतर पुण्येश्वर मंदिराजवळील सुरक्षा वाढवली; मोठा फौजफाटा तैनात

हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दिन दर्गा आणि पुण्येश्वर मंदिराजवळील सुरक्षा प्रशासनाने वाढवली आहे.
Punyeshwar Temple
Punyeshwar TempleSaam TV

प्राची कुलकर्णी -

पुणे : देशात सध्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Masjid) शिवलिंग सापडल्याच्या चर्चा सुरु आहेत. या ठिकाणी शिवलिंग सापडलं असून याठिकाणी मंदिरच असल्याचा दावा हिंदुत्ववादी पक्षाकडून केला जात आहे. तर त्या ठिकाणी मशिदच असल्याचा दावा समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqurrahman Burke) यांनी केला आहे. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीवरुन देशातील दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असतानाचं आता पुण्यात देखील मंदिर आणि मशिदींवरुन नवा वाद सुरु झाला आहे.

पुणे शहरातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या (Punyeshwar and Narayaneshwar Temple) जागांवर दर्गा उभारण्यात आल्याचा दावा मनसे (MNS) नेते अजय यांनी केला आहे. शिंदे यांच्या या दाव्यानंतर आता शहरातील वातावरण चांगलंच तापलं असून हिंदू महासंघानेही या वादात उडी घेतली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दिन दर्गा (Hazrat Khwaja Sheikh Salahuddin Dargah) आणि पुण्येश्वर मंदिराजवळील सुरक्षा प्रशासनाने वाढवली आहे. पुण्येश्वर मंदिराजवळ पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पुण्यातल्या पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जाग्यांवर आता मशिदी असल्याचा दावा करण्यात आला असून यामुळे या मंदिराच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, पुण्यात दर्ग्याच्या जागी पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिर होती हा मनसेने केलेला दावा इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी खोटा असल्याचं म्हटलंय. त्या परिसरात शहाजी राजे यांची जहागीरी होती, नंतर पेशवाई आली त्यांनी दर्ग्याला देणगी दिली त्यामुळे या जागी मंदिर नसून दर्गा असल्याचा दावा इतिहास संशोधक करताहेत. मुठानदी काठी अनेक मंदिर आहेत. शिव मूर्ती आहेत.जो दर्गा आहे त्याचा इतिहास वेगळा असल्याचं इतिहास संशोधकांकडून सांगितलं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com