Mumbai: महिला क्लीन अप मार्शलला हाणामारी, क्लीनअप मार्शल्समध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दंड भरण्यावर झालेल्या वादामुळे संतप्त महिलेने २ क्लीन- अप मार्शल्सला मारहाण करण्यात आली आहे.
Mumbai: महिला क्लीन अप मार्शलला हाणामारी, क्लीनअप मार्शल्समध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी
Mumbai: महिला क्लीन अप मार्शलला हाणामारी, क्लीनअप मार्शल्समध्ये फिल्मी स्टाईल हाणामारीSaam Tv

मुंबई : मुंबई Mumbai विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर क्लीन- अप मार्शल्स कडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यावेळी क्लीन अप मार्शल आणि नागरिकामध्ये खूप वेळा वाद होण्याच्या घटना समोर येत आहेत. आता अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दंड भरण्यावर झालेल्या वादामुळे संतप्त महिलेने २ क्लीन- अप मार्शल्सला मारहाण करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंधेरी पश्चिम परिसरातमधील एस व्ही रोडवर झाली आहे. सायंकाळच्या सुमारास एक महिला रिक्षामधून बाहेर निघाली त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर मास्क हा तोंड्याच्या खाली होता. हे बघून क्लीन- अप मार्शल्सने त्या महिलेला दंड भरण्यास सांगितले आणि दंडात्मक कारवाईची पावती देण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईवरुन महिला आणि क्लीन- अप मार्शलमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू झाली होती. आणि याचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले आहे.

हे देखील पहा-

यावेळी बघ्यांची मोठी प्रमाणात गर्दी झाली होती. हा हाणामारीमध्ये क्लीन- अप मार्शल गंभीर जखमी झाली आहे. या क्लीन अप मार्शलला उपचाराकरिता रूपक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात माटुंगा परिसरामध्ये नागरिकांनी क्लीन अप मार्शलला मारहाण केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक सेनापती बापट रोडवर परत एकदा क्लीन अप वाल्यांची दादागिरी बघायला मिळाली होती.

दंडाच्या पैशापेक्षा जास्त रकमेची मागणी केल्याने सर्व त्रस्त जनतेने त्याला जाब विचारला आहे. यादरम्यान वाद झाला असल्याची माहिती मिळाली आहे. क्लीन अप मार्शलच्या भोवती नागरिक जमा झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या क्लीन अप मार्शलच्या हातामध्ये एक दगड असून, तो नागरिकांना दगड फेकून मारण्याची धमकी देत असताना दिसून येत आहे. एका नागरिकाच्या पोटात या क्लीन अप मार्शलने गुद्दा देखील लगावला आहे.

Mumbai: महिला क्लीन अप मार्शलला हाणामारी, क्लीनअप मार्शल्समध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी
"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं"; नवाब मलिक

यानंतर आक्रमक झालेल्या लोकांनी या क्लीन अप मार्शलला चांगलाच झोडपले आहे. एकाने तर त्याच्या डोक्यात हेल्मेट देखील मारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर या क्लीन अप मार्शलने तिथून पळ काढला आहे. मुंबईमध्ये क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये वाद होण्याची ही नेहमीची वेळ आहे. संतप्त नागरिक अंगावर येत असल्यामुळे या क्लीन अप मार्शलने दगडे मारण्यास सुरुवात केली होती. हा प्रसंग खूप वेळ चालू होता.

परंतु, पोलीस येण्यास खूप उशीर झाला. नेहमी पोलीस नाकाबंदीकरिता उभे असतात, पण अशा घटना घडतात तेव्हा पोलीस यंत्रणा वेळ का घेते? असा प्रश्न विचारला जात आहे. कोणाचा जीव गेल्यावर पोलीस यंत्रणा, महानगरपालिका आणि सरकार अशा गोष्टीकडे लक्ष घालणार का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. महानगरपालिका आणि सरकारने कोरोनाच्या नावाने होणारी लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com