RTI Information: 'वर्षा'वर 3 महिन्यात जेवणासाठी तब्बल 2.38 कोटींचा खर्च; चहा नाश्त्यावरील खर्चाचा आकडाही मोठा

शिंदे सरकारने ७ महिन्यात जाहिरातींसाठी ४२ कोटी रुपये शासकीय तिजोरीतून खर्च केल्याची माहिती समोर आली होती.
Shinde Government
Shinde Government Saam tv

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानावर ३ महिन्यात जेवणासाठी तब्बल २ कोटी ३८ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव याबाबतची माहिती मागवली होती.

मिळालेल्या माहितीनसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर खानपान सेवेसाठी १ जुलै २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या १२३ दिवसात २ कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपये खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच दिवसाला सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानावर होत आहे. (Political news)

Shinde Government
Pune News: क्षुल्लक कारणावरुन पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला संपवलं, पुण्यातील मन सून्न करणारी घटना

नुकतेच शिंदे सरकारने ७ महिन्यात जाहिरातींसाठी ४२ कोटी रुपये शासकीय तिजोरीतून खर्च केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानात होणाऱ्या खर्चाची धक्कादायक माहिती मिळाली असल्याचं नितीन यादव यांनी सांगितलं.

Shinde Government
NCP: राष्ट्रवादीने कोश्यारींना जाता जाता डिवचले, मार्कशीट व्हायरल; इतिहासात भोपळा, मात्र 'या' विषयात १००...

सह्याद्री अतिथिगृहाता चहा कॅाफी नाश्तासाठी ८ दिवसात ९१ हजार ५०० रुपयांचा खर्च केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री बैठक व त्यांचे भेटीसाठी आलेल्या व्यक्तींसाठी चहा, कॉफी, थंड पेयासाठी ३ लाख ४९ हजार ९२९ रुपयांचा खर्च केल्याची माहिती या पत्रात आढळून येत आहे. शिंदे सरकारने होणारा वारेमाप खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती देखीन नितीन यादव यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com