Narendra Modi : पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल; शिंदे-फडणवीसांनी केलं जंगी स्वागत, महाराष्ट्राकडून दिली अनोखी भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना महाराष्ट्राकडून अनोखी भेट दिली.
PM Narendra Modi Mumbai Live
PM Narendra Modi Mumbai LiveANI

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचं विमानतळावर स्वागत केलं. विमानतळावरून मोदींचा ताफा थेट बीकेसीच्या मैदानावर पोहचला. बीकेसीवर पोहचताच ढोल ताशांच्या गजरात मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना महाराष्ट्राकडून अनोखी भेट दिली. (Latest Marathi News)

PM Narendra Modi Mumbai Live
PM Narendra Modi in Mumbai : ...म्हणून माेदीसाहेब मुंबईला येताहेत : भास्कर जाधव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) महाराष्ट्राच फेटा घालून सत्कार केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा भेट म्हणून दिला. यावेळी दोघांनी मिळून मोदींना चाफ्याच्या फुलांचा हार देखील घातला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

मोदींच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या ७ सांडपाणी प्रकल्पांचे, ३ रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. याशिवास मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.  (Maharashtra Political News)

त्यानंतर पंतप्रधानांची बीकेसी मैदानावर सभा देखील होणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, या दौऱ्यावरून विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारी बरीचशी कामं ही महाविकास आघाडीच्या काळात झाली असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com