Eknath Shinde: उद्धव ठाकरेंना पुन्हा दणका? ठाकरेंआधी शिंदेंकडून भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग?

उद्या दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ कवाडे गटाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे पत्रकार परिषद घेणार आहेत.
Eknath Shinde-Jogendra KAwade
Eknath Shinde-Jogendra KAwadeSaam TV

मुंबई : शिंदे आणि ठाकरे गटातील राजकीय चढाओढ कायम आहे. दोन्हीही गट आपली ताकद दाखवण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत. एकीकडे शिवसेनेचा ठाकरे गट पक्षाला बसलेल्या फुटीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे शिंदे गट ठाकरे गटाला धक्का देण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नाने ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात नवी भीमशक्ती-शिवशक्ती उदयास येईल अंदाज बांधले जात आहेत. त्यात आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे दणका देण्याच्या तयारीत आहेत. (Latest Marathi News)

Eknath Shinde-Jogendra KAwade
महापालिकांसाठी वंचित-शिवसेनेचं ठरलं; महाविकास आघाडीचं काय? प्रकाश आंबेडकर यांनी सर्वकाही सांगितलं...

कारण नवी भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गट युतीच्या संदर्भात आपली भूमिका उद्या जाहीर करणार आहे. उद्या दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ कवाडे गटाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे पत्रकार परिषद घेणार आहेत. या युतीमुळे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते.

Eknath Shinde-Jogendra KAwade
Uday Samant : संजय राऊत यांना मंत्री उदय सामंत यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले,'महिला भगिनींना...'

जोगेंद्र कवाडे यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत दीर्घ चर्चा झाली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या चर्चेनुसार आगामी निवडणुकीतील शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रं लढणार आहे, असं जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं होत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com