सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest News Saam Tv

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर खरी शिवसेना नेमकी कुणाची अशी चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यातच आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. खरी शिवसेना (ShivSena) आपलीच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. अशातच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक झटका दिला आहे. (CM Eknath Shinde News)

Eknath Shinde Latest News
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी...'; NCP च्या आमदाराने शिंदे सरकारला दिला मंत्रिमंडळ विस्तारासाठी सल्ला

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. नव्या नियुक्तीनुसार, शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे.

याआधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. (Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde Latest News
Covid Center : कोरोना रुग्णांची संख्या घटली; मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे यांना देण्यात आली. बाकी शिलेदारांना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात शिवसैनिकांच्या बैठकी घेत आहेत. तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात निष्ठा यात्रा काढली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या दोन गटांची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com