
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं. मोदींनी बीकेसी मैदानावर जोरदार भाषण करत मुंबई महापालिकेचं रणशिंग देखील फुंकलं. मोदींनी मुंबई मेट्रोचं उद्घाटन देखील केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काहीतरी बोलले. ज्यामुळे मोदी खळखळून हसले. या मजेशीर प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
नेमकं काय घडलं?
बीकेसीवरील सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रोचे उद्घाटन केलं. मोदींनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मेट्रोमधून प्रवास देखील केला. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मोदीसोबत मेट्रोमध्ये बसलेले असताना, त्यांनी मोदींसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. (Maharashtra Political News)
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोदींच्या कानात काहीतरी गोष्ट सांगितली. ही गोष्ट ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हसू आवरलं नाही. शिंदेंची गोष्ट ऐकून मोदी खळखळून हसले. मोदी आणि शिंदेमधील झालेला जोक फडणवीसांनाही समजला. फडणवीस देखील हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा ताफा थेट मुंबईतील बीकेसी मैदानाकडे वळाला. बीकेसीवर पोहचल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मोदींचं स्वागत केलं.
मोदींच्या हस्ते मुंबईतील वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. या दौऱ्यातून पंतप्रधानांनी महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. गरिबांचे पैसे घोटाळ्यामध्ये जात होते, पण मागच्या 8 वर्षांमध्ये परिस्थिती बदलली. जगातली अर्थव्यवस्था अडचणीत असताना आपण 80 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.