Nanded News: नांदेड सरकारी रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची CM शिंदेंकडून गंभीर दखल; म्हणाले, दोषींवर कारवाई होणारच!

Nanded News: नांदेड मृत्यू प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Cm Eknath Shinde On Maratha Reservation
Cm Eknath Shinde On Maratha Reservationsaam tv

सचिन गाड

CM Eknath Shinde News:

नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरू आहे. नांदेडमधील घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नांदेड शासकीय रुग्णालयातील ३१ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. याचदरम्यान, नांदेड मृत्यू प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

नांदेडमधील घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'मंत्रिमंडळ बैठकीत नांदेड घटना संदर्भात आढावा घेतला. ही घटना गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणाशी संबंधित मंत्री आणि अधिकारी घटनास्थळी गेले आहेत'.

Cm Eknath Shinde On Maratha Reservation
Nana Patole News: 'नांदेड अन् घाटी रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या, ३०२ चे गुन्हे दाखल करा...' नाना पटोलेंची मागणी

'या रुग्णालयात १२७ प्रकारची औषधं होती. रुग्णालयात औषध तुटवडा नव्हता. तसेच स्टाफ पूर्ण आहे. या रुग्णालयाला नवीन निधी दिला आहे. या प्रकरणी चौकशी केली जाईल, त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. या घटनेत वयोवृद्ध लोक होती. तसेच रस्ता अपघात आणि लहान बालक वजनाने कमी होती. मात्र अधिकृत माहिती अहवाल आल्यानंतर दिली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सरकारकडून देण्यात येणाऱ्या आनंद शिध्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा दिला जणार आहे. मैदा आणि पोहे हे दोन पदार्थ वाढवले आहेत. सोयाबीनवर जो रोग आलाय. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील पीक पाणी आढावा घेतला आहे'.

Cm Eknath Shinde On Maratha Reservation
Cabinet Decisions : दिवाळीआधी सर्वसामान्यांना शिंदे सरकारकडून 'गिफ्ट'; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

दरम्यान, जातिनिहाय जनगणनेवरून भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली, या संदर्भात चर्चा झाली. त्या ठिकाणचा अभ्यास करुन गरज पडली तर योग्य निर्णय घेतला जाईल'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com