Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये; म्हणाले...

आज स्वत: मुख्यमंत्र्यांनी बीकेसी मैदानात जाऊन पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दसरा मेळाव्याच्या तयारीवर भाष्य देखील केले
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSaam TV

सूशांत सावंत

Eknath Shinde News : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने खरी शिवसेना असल्याचा दावा करत दसरा मेळाव्यावर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटानेही मुंबईत दसरा मेळाव्याचे (Dasara Melava) आयोजन केले आहे.

उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानात समर्थकांना संबोधित करणार आहे. याच दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. आज स्वत: मुख्यमंत्र्यांनी बीकेसी मैदानात जाऊन पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दसरा मेळाव्याच्या तयारीवर भाष्य देखील केले.

Eknath Shinde Latest News
'जनतेत जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही'; धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बीकेसी मैदानात जाऊन पाहणी केली. कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आसन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था,सुरक्षा व्यवस्था, मैदान , पाऊस याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. लाखो कार्यकर्ते मेळाव्यासाठी येणार असल्याने मुख्यमंत्री स्वत: याकडे जातीने लक्ष घालत आहेत.

Eknath Shinde Latest News
दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंची तोफ धडाडणार, 'त्या' बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण

दसरा मेळाव्याच्या तयारीवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे, त्याची पाहणी मी केली. लोकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत आहोत. प्रशासनाने दोघांनाही शिवाजी पार्कचे सुरुवातीला नाकारले. त्यानंतर कोर्टात ते गेले. त्यांना कोर्टाने परवानगी दिली. मी आता सुप्रीम कोर्टात जाणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात न जाता दसरा मेळावा साजरा करणार'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com