ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी लिलावती रुग्णालयात दाखल; मुख्यमंत्रीही पोहोचले भेटीला

Appasaheb Dharmadhikari Admitted In Hospital : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरू आहेत.
Eknath Shinde Meets Appasaheb Dharmadhikari
Eknath Shinde Meets Appasaheb DharmadhikariSaam TV

मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल (Lilavati Hospital Mumbai) करण्यात आले आहे. रुटीन चेकअप सुरु असताना तपासण्यांना उशिर होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे गुरू आहेत, त्यामुळे मुख्यमंत्रीही तातडीने त्यांना भेटण्यासाठी लिवावती रुग्णालयात पोहोचले आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

शिंदे कुटुंबाचे धर्माधिकारी हे गुरु -

अप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील जाणते समाजसेवक (Social Worker) आहेत. त्यांचे वडिल नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत असतात आणि समाज प्रबोधन करत असतात. २०१४ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. २०१७ मध्ये त्यांनी चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

राज्यातील सर्वच पक्षातील (Political Parties) अनेक नेते धर्माधिकारी कुटुंबाला आपलं गुरू मानतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ते गुरू आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी लिलावती रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच ते रुग्णालयात पोहोचले आणि त्यांची भेट घेतली.

सामाजिक परिवर्तवनाची चारशे वर्षाची परंपरा


समर्थ रामदासांच्या दासबोधाच्या निरूपणाचा वारसा वडील डॉ. नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून घेऊन तो समर्थ बैठकांच्या माध्यमातून अधिक प्रभावी करण्याचे आणि त्याला सामाजिक परिवर्तनाचा आधुनिक आयाम देण्याचे अनन्यसाधारण काम पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्ती या क्षेत्रांत त्यांनी प्रभावीपणे प्रबोधनाचे काम केले. योग्य वेळी भविष्याचा वेध घेत मानववंशाच्या हितासाठी पर्यावरण संवर्धनाच्या विचाराला प्राधान्य दिले. देश-परदेशातील हजारो बैठकांच्या माध्यमातून लाखो अनुयायांच्या मनात तो विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजविण्यात आप्पासाहेबांनी निरुपणातून यश संपादन केले आहे. अलीकडच्या काळातील मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या यशस्वी चळवळीचे प्रत्यंतर देणारे असेच आहे. धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com