Maharashtra Politics : PM मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट लागला कामाला; मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्या 'या' सूचना

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने महत्वाची बैठक आयोजित केली आहे.
Eknath Shinde, Narendra Modi
Eknath Shinde, Narendra ModiSaam Tv

Eknath Shinde News : पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची यंत्रणा सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने महत्वाची बैठक आयोजित केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या आमदारांना सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना आणण्याचा सूचना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Eknath Shinde, Narendra Modi
Raj Thackeray Parli Court Updates : राज ठाकरेंना अटक की जामीन ? थाेड्याच वेळात फैसला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या गटातील मंत्री, आमदार,प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक आज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत उद्याच्या नियोजनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मार्गदर्शन करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना आणण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही. सभे ठिकाणी नागरिक वेळेत पोहचतील याचीही काळजी घेण्याबाबत आमदारांना सूचना दिल्या जाणार आहेत.

अनेक आमदार मतदारसंघात असल्याने ते या बैठकीला व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे सहभागी होणार असल्याचे कळते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील थोड्याच वेळात दावोसहून मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या सभेचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.

Eknath Shinde, Narendra Modi
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून ७०० कोटींचा निधी मंजूर, या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान

मुंबई महापालिकेच्या विविध कामांचे लोकार्पण PM मोदींच्या हस्ते होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात मुंबई महापालिकेच्या विविध कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या या कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर विशेष लक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com